सौ. सुहासिनी रमेश नायडू
मी, सौ. सुहासिनी रमेश नायडू, प्रभाग क्रमांक २२ साठी भारतीय जनता पार्टीची अधिकृत इच्छुक उमेदवार म्हणून जनसेवेसाठी सज्ज
आहे. माझे ध्येय केवळ निवडणूक जिंकणे नसून, राष्ट्रहितासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी माझ्या प्रभागामध्ये जनहिताचे प्रभावी
कार्य करणे आहे. मागील अनेक दशकांपासून मी राजकारणविरहित वृत्तीने समाजसेवेत आहे. या अनुभवाच्या आधारावर, मी एक मूलभूत गरज
ओळखली आहेः ती म्हणजे स्थानिक विकासाची अनिवार्यता. आजच्या विकसनशील नवी मुंबईत रहिवाशांना मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध
असूनही, उच्चशिक्षण, रोजगार आणि आर्थिक विकासाच्या संधींसाठी अद्यापही त्यांना मुंबई महानगर क्षेत्रावर अवलंबून राहावे लागत
आहे. स्थानिक पातळीवर सर्वांगीण विकास साधून स्वावलंबन निर्माण करणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे.
नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर आहे असून प्राथमिक गरजा म्हणून विद्युत (वीज) आणि जल (पाणी) या अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध
आहेत, परंतु इतर मूलभूत नागरी सुविधांचे प्रश्न देखील प्रलंबित आहेत. नेरुळ-जुईनगर परिसरामध्ये जुन्या बांधकामाची झालेली
दैना व पुनर्विकासाची धूम आणि सध्यस्थित असलेले अनधिकृत बांधकामांचा प्रश्न असो. यासोबतच निर्माण होणारी वाहतूक कोंडी,
स्वच्छता यांसारखे प्रश्न प्रमुख्याने समोर येत आहेत.
सध्या मी या पदांवर कार्यरत आहे:
- जिल्हा सचिव, भारतीय जनता पक्ष, नवी मुंबई
- जिल्हा अध्यक्षा, नेनो फाउंडेशन
- जिल्हा अध्यक्षा, ऑल इंडिया जनर्लिस्ट असोसिएशन
- हरित सेना सदस्य, महाराष्ट्र शासन
MY AGENDA
माझा उद्देश
अनधिकृत बांधकाम उपाययोजना
समाजाच्या नियमबाह्य बांधकामांवर कठोर कारवाई करून सुरक्षित आणि नियोजित विकास सुनिश्चित करणे.
वरिष्ठ नागरिकांसाठी सुविधा
वरिष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे, व्यायाम सुविधा, बस सेवा आणि मार्गदर्शन कार्यक्रम सुरू करणे.
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य
महिला सुरक्षा, स्वावलंबन व सक्षमीकरणासाठी विशेष मोहिमा, प्रशिक्षण आणि मदत केंद्र आयोजित करणे.
स्वच्छ व हिरवीगार नवी मुंबई
स्वच्छता, वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचा प्रोत्साहनपूर्वक विकास.
Development Insights
विकासाची सखोल झलक
आम्रपाली सोसायटी, सेक्टर २ येथे स्वखर्चाने स्वखर्चाने पाणी पाईपलाईन दुरुस्ती तसेच लोखंडी पायऱ्या बसविण्यात आल्या.
नागरिकांच्या तक्रारीनुसार मनपा अधिकाऱ्यांच्या सहकार्याने वार्ड क्रमांक ८४, सेक्टर २ - बळीराम जोशी मार्ग व सेक्टर 4 - नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग येथे रोड डांबरीकरण पूर्ण करण्यात आले.
नेरूळ वार्ड ८४ मधील आम्रपाली अपार्टमेंट येथे कंपाउंड बांधकामासाठी सौ. सुहासिनी रमेश नायडू यांच्यातर्फे रेती, भुसा व सिमेंट प्रदान करण्यात आले.